1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. Pune Self committed suicide by shooting dead wife and nephew

Pune: पत्नी आणि पुतण्याची गोळी मारून हत्या करून स्वतः आत्महत्या केली

पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तयांनी पत्नी आणि पुतण्यावर गोळी झाडून हत्या केल्यांनतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरत गायकवाड असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.  भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्यास होते.
 
ही घटना पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे.  मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.मात्र, पत्नी आणि पुतण्याच्या हत्येचं कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
पुढील लेख
ढगफुटी म्हणजे काय? What are Cloudbursts?