शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: तळेघर , सोमवार, 17 जुलै 2023 (16:36 IST)

Heart attack while trekking ट्रेकिंग करताना हार्ट अटॅक

heart attack
Heart attack while trekking रमेश भगवान पाटील (57) असे मृत झालेल्या ट्रेकर्सचे नाव असून ते पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असणारे भीमाशंकर कडे ट्रेकिंग करून येत असताना पिंपरी चिंचवड येथील पिंपळे नीलख येथील त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.  ते पिंपरी चिंचवड येथील पिंपळे निलख येथील राहणारे होते. पुण्यात राहणाऱ्या आनंद सुभाष साळगावकर यांनी या ट्रेकचे आयोजन केले होते.
 
साळगावकर हे वकील व्यवसाय करतात. त्यांना गड आणि किल्ले फिरण्याचा छंद आहे. त्यांनी रमेश पाटील यांच्यासह दिनेश बोडके, मंजीत चव्हाण, प्रवीण पवार, संदीप लोहकर, सुनील गुरव व इतर तीन जणांनी मिळून पुणे ते भीमाशंकर असे 25 किलोमीटरचे पाई ट्रेकिंग आयोजित केले होते. रविवारी दि.16  रोजी सकाळी पहाटे पावणे सात वाजता मावळ तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथून त्यांनी पायी चालायला सुरुवात केली. पायी चालत भीमाशंकर कडे येत असताना गुप्त भीमाशंकर येथे दुपारी अडीच वाजता खेड तालुक्याच्या हद्दीत रमेश पाटील हे अचानक चक्कर येऊन खाली पडले. यावेळी सर्वांनी त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.