1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 जुलै 2023 (18:02 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

narendra modi
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवणारआहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. त्यांना स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये पुरस्कार रूपात दिले जाणार आहे. 

1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. या निमित्त पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात हा सोहळा होणार असून पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार देण्यात येईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार, आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशील कुमार शिंदे उपस्थित राहणार आहे. 
 
 Edited by - Priya Dixit