गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (14:58 IST)

Dr. Mangal Narlikar passed away : ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन

Dr. Mangal Narlikar passed away :डॉ. जयंत नारळीकर यांची पत्नी आणि ज्येष्ठ गणिततज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योती मालवली.

डॉ. मंगला नारळीकर यांचा जन्म 17 मे 1943 रोजी झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून 1862 साली बीएची पदवी घेतली नंतर त्यांनी 1964 साली गणितात एम एची पदवी घेतली. 

त्यांना गणिताची विशेष आवड होती. त्यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण होण्यासाठी विशेष काम केले आहे. डॉ. मंगला यांना काही वर्षांपूर्वी स्तनाचा कर्करोग झाला होता त्यातून त्या बऱ्या झाल्या. आता त्यांना फुफ्फुसाचे कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले. 
डॉ. मंगला नारळीकर यांच्यावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit