गुरूवार, 21 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (12:07 IST)

Uttarakhand : केदारनाथ मंदिरात मोबाईल नेण्यावर बंदी

Kedarnath
केदारनाथ मंदिरात आता भाविकांना मोबाईल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच भाविकांना मंदिराच्या परिसरात देखील फोटो काढता किंवा व्हिडीओ बनवता येणार नाही. बद्रीनाथ - केदारनाथ मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे. 

नुकतेच एका महिलेने मंदिर परिसरात वादग्रस्त व्हिडीओ बनवण्याच्या प्रकरणावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. या साठी बद्रीनाथ - केदारनाथ मंदिर समितीने ठीक ठिकाणी फलक लावले आहे. 

ज्यावर मंदिराच्या आवारात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिरात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई आहे, असे लिहिले आहे. तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहात.

इतकेच नाही तर मंदिरात येणाऱ्या भाविकांना व्यवस्थित कपडे परिधान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे. असे फलक मंदिराच्या आवारात हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिले आहे. 

मंदिराच्या सामितिचे अध्यक्ष म्हणाले की, हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे लोक मोठ्या श्रद्धेने येतात, भाविकांनी त्याचा आदर केला पाहिजे. ते म्हणाले की बद्रीनाथ धाममधून अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतु असे फलक तिथे देखील लावण्यात येतील 
 
Edited by - Priya Dixit