गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (17:03 IST)

आर्यन खानला जामीन मंजूर

गेल्या अनेक दिवसांपासून ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्याचे वडील आणि बॉलिवुड सुपरस्टार शाहरुख खानला दिलासा मिळाला आहे.
 
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी आर्यन उद्या किंवा शनिवारीच तुरुंगातून बाहेर येऊ शकणार आहे. तब्बल तीन तास चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने आर्यनसह तिन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
 
आर्यन खानसह उर्वरित तीन आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगात काढावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दुपारी 3 वाजता सुरू झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 4.45 वाजता निकाल दिला.