1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (13:43 IST)

कतरिना कैफ आणि विकी कौशल डिसेंबरमध्ये लग्न करणार, तयारी सुरू

Katrina Kaif and Vicky Kaushal will get married in December
कतरिना कैफ आणि विकी कौशलचे प्रेम वेळोवेळी चर्चेत असतो, जरी या दोघांनी कधीही सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही. पण दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते. कतरिनाच्या घराबाहेर विकीची कार अनेकवेळा दिसली होती, ज्यामुळे बॉलिवूडमधून सतत बातम्या येत होत्या की दोघे एकमेकांबद्दल खूप गंभीर आहेत.
ताजी बातमी म्हणजे कतरिना आणि विकी लवकरच लग्न करणार आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की, डिसेंबरमध्ये हे लग्न होऊ शकते. दोघांनाही आता त्यांच्या नात्याला पुढच्या पातळीवर न्यायचे ठरवले आहे. त्याची जय्यत तयारीही सुरू झाली आहे.
कतरिना कैफ लग्नात घालणार तो लेहेंगा सब्यसाचीने डिझाईन करायलाही सुरुवात केली आहे कारण आता जास्त वेळ नाही.
लग्न कुठे होणार याचीही चर्चा सुरू आहे. हे लग्न भारतात होणार आहे, की मुंबईबाहेर हे अद्याप ठरलेले नाही. 
 
कतरिना आणि विकीचा रोका सेरेमनी झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. साखरपुडा झाल्याची बातमी गुप्त ठेवण्यात आली आहे, पण का, हे अद्याप कळू शकलेले नाही.
कतरिनाचे नाव यापूर्वी सलमान खान आणि रणबीर कपूरसोबत जोडले गेले होते आणि आता त्यांचे विकीसोबतचे नाते चर्चेत आहे. लग्नाबाबत अद्याप कोणतीही पुष्टी नाही, परंतु  असं म्हणतात की आगीशिवाय धूरही निघत नाही.