गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (11:48 IST)

कंगना रणौत सेल्युलर जेलमध्ये पोहोचली ,इथे सावरकरांनी काळ्यापाणीची शिक्षा भोगली होती, फोटो व्हायरल

Kangana Ranaut reaches cellular jail
कंगना राणौत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या अभिनेत्रीने आता सेल्युलर जेलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत,हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
कंगना राणौत आज अंदमान निकोबार मधील सेल्युलर जेलमध्ये गेली. हा तोच जेल आहे जिथे वीर सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. कंगनाने तुरुंगातील तिचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, “आज अंदमान निकोबारला पोहोचल्यानंतर सेल्युलर जेलमधील वीर सावरकरांच्या सेलला भेट दिली. या दरम्यान मी पूर्णपणे हादरून गेले.
 
सावरकरांनी प्रत्येक क्रूरतेचा प्रतिकार केला. तेव्हा इंग्रज किती घाबरले असावेत, कारण त्यांनी वीर सावरकरांना त्या काळात काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती.
 
समुद्राच्या मधोमध असलेल्या या छोट्याशा बेटातून पळून जाणे अशक्य आहे, तरीही इंग्रजांनी वीर सावरकरांना बेड्या ठोकल्या, जाड भिंतीचा तुरुंग बांधला आणि एका छोट्या कोठडीत बंद केले. कंगनाच्या या पोस्टवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. सर्वजण कंगनाचे खूप कौतुक करत आहेत.