गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (15:40 IST)

67th National Film Awards : पाहा विजेत्यांची यादी

67th National Film Awards winners list
आज 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. हिंदी चित्रपटांच्या विभागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 
 
बेस्ट एक्टर आणि एक्ट्रेस
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'छिछोरे' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
 
अभिनेते मनोज बाजपेयी आणि धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
 
अभिनेत्री कंगना राणौत हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. कंगनाला 'मणिकर्णिका' आणि  'पंगा' या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. कंगना राणावतला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
 
अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील 'तेरी मिट्टी' या गाण्याचे पार्श्वगायक बी प्राक यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 
सिक्किमला चित्रपटांसाठी अनुकूल राज्य म्हणजेच (मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट) या पुरस्काराने गौरवण्यात आले.
'अॅन इंजिनियर ड्रीम' या चित्रपटाला नॉन-फीचर चित्रपटाच्या श्रेणीत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
 
'मराकर-अरबीकादलिंते-सिहम' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
 
'महर्षी' चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे, तर आनंदी गोपाळ या चित्रपटाला सामाजिक समस्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.