मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (10:43 IST)

आर्यन खानची आज तुरुंगातून सुटका होऊ शकते, शाहरुखच्या मुलासाठी 'मन्नत सजविले

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आता त्याच्या सुटकेच्या प्रतीक्षेत आहे. शुक्रवारी त्याच्या सुटकेचा आदेश वेळेवर मिळू शकला नाही, त्यामुळे वेळ लागला. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनची आज सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत तुरुंगातून सुटका होऊ शकते. 
 
शुक्रवारी दिवसभर सर्वजण आर्यन खान घरी परतण्याची वाट पाहत होते. शाहरुख खानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानची शनिवारी सकाळी तुरुंगातून सुटका होणार आहे. त्याचवेळी मन्नतही सजविले आहे. शाहरुखच्या बंगल्याची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत जिथे आर्यनच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण झाली असून इमारतीवर रोषणाई करण्यात आली आहेत. 

अभिनेत्री जुही चावलाने 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन घेतला असून वकिलांनी सर्व औपचारिकता पूर्ण केली आहे. उच्च न्यायालयाने जामीन आदेश दिल्यानंतर जुही चावला एनडीपीएस न्यायालयात पोहोचली आणि एक लाख रुपयांचा जातमुचलक जमा केला. आर्यन खानचा वकीलही त्यांचा सोबत होता.
 
कोर्टाच्या आदेशात आर्यनच्या जामिनासाठी 14 अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी लक्षात घेता आर्यनची जामिनाची औपचारिकता पूर्ण करून तुरुंगातून सुटका होईल. आर्यनच्या सुटकेची कागदपत्रे निर्धारित वेळेत मिळाली नाहीत, त्यामुळे आर्यनची सुटका होऊ शकली नाही, असे तुरुंगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.