मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 14 फेब्रुवारी 2024 (15:31 IST)

बडे मियाँ छोटे मियाँ जोडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी या व्हॅलेंटाईन डे च्या दिल्या ब्रोमान्समय शुभेच्छा

akshay kumar
अक्षय आणि टायगर ने ब्रोमान्स साजरा करत व्हॅलेंटाईन डे च्या दिल्या हटके शुभेच्छा  बॉलीवूडचा रिअल ॲक्शन चित्रपट "बडे मियाँ छोटे मियाँ" च्या रिलीजच्या आधी चर्चेचा विषय ठरतोय. आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने या बॉलीवूड च्या नवीन ॲक्शन जोडीने म्हणजे अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ ने भन्नाट ब्रोमान्स साजरा करत खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ऑन-स्क्रीन डायनॅमिक केमिस्ट्री एड्रेनालाईन-पॅक मनोरंजन तर करणार आहे पण ऑफ स्क्रीन त्यांची ही धम्माल मस्ती सुरू असते हे सगळ्यांना दिसून येत. 
या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांचे काही ब्रोमन्स फोटो शेअर केले आहेत:
 
 
ॲक्शन सुपरस्टार या थरारक प्रवास सुरू होत असताना चाहत्यांना खिलाडी कुमार आणि बॉलिवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ यांच्यातील ॲक्शन आणि सौहार्दाचा रोलरकोस्टर राईड दिसणार आहे. अली अब्बास जफर यांनी लिखित आणि दिग्दर्शित केलेला आणि पूजा एन्टरटेन्मेंट आणि AAZ फिल्म्सच्या प्रोडक्शन बॅनरखाली निर्मित बॉलीवूडचा खरा ॲक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.