‘बाहुबली’ चे दुसरे पोस्टर रिलीज (फोटो)
‘बाहुबली: द कनक्ल्यूजन’चे दुसरे पोस्टर रिलीज झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले. रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियातून चांगलीच पसंती मिळत आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून, हा सिनेमा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे. यातील कोणता भाग सिनेमाच्या मुख्य कॉपीत असेल हे जरी सांगितले जात नसले, तरी या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.