शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 5 मार्च 2018 (10:37 IST)

चीनमध्येही ‘बजरंगी भाईजान' हिट

bajranji bhaijan hit in chiana

अभिनेता सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान' २ मार्चला चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. ‘लिटिल लोलिता मंकी गॉड अंकल’ या नावाने प्रदर्शित झालेल्या ‘बजरंगी भाईजान’च्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

चीनमध्ये पहिल्याच दिवशी ‘बजरंगी भाईजान’ने २.२४ मिलीयन डॉलर इतकी कमाई केली आहे. कमाईचा हा आकडा गाठत सलमानच्या चित्रपटांच्या यादीत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘बजरंगी भाईजानने बाजी मारली आहे. सलमान खान, बालकलाकार हर्षाली मल्होत्रा आणि अभिनेत्री करिना कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला चीनमध्ये ८००० स्क्रिन्सवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. भारतात या चित्रपटाने ३२०. ३४ कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत फक्त सलमानच्याच नव्हे, तर आमिरच्या ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांनाही चीनमधील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.