शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (09:04 IST)

सोन्याचे दागिने का लादत होते बप्पी दा, कारण जाणून व्हाल हैराण

बॉलिवूडचे सर्वोत्कृष्ट गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांचे निधन झाले. बप्पी दा यांनी जवळपास 48 वर्षे आपल्या सर्वोत्कृष्ट गाण्यांद्वारे प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. जवळपास 500 चित्रपटांमध्ये त्यांनी 5000 हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आणि गायली. बप्पी दा आपल्या संगीत कारकिर्दीव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत असायचे. त्यांना सोन्याचे दागिने घालण्याची खूप आवड होती. एका मुलाखतीत त्याने यामागचे कारणही सांगितले.
 
बप्पी दा म्हणाले होते की ते अमेरिकन स्टार एल्विस प्रेस्लीचे खूप मोठे चाहते आहे. त्यांनी एल्विसला प्रत्येक परफॉर्मन्समध्ये सोन्याची चेन घातलेला पाहिला होतं. तेव्हा बप्पी त्यांच्या संघर्षाच्या टप्प्यात होते आणि त्यांनी निश्चय केला होता की ते यशस्वी झाल्यावर ते सुद्धा भरपूर सोने घालणार आहे. जेव्हा ते यशस्वी झाला तेव्हा त्यांनी तेच केले आणि इतके सोने घातले की त्यांना भारताचा सुवर्णपुरुष म्हणजे गोल्ड मॅन म्हटले जाऊ लागले.
 
बप्पी दा यांच्या म्हणण्यानुसार, सोने देखील त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरले, म्हणून त्यांनी ते घालणे कधीच सोडले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बप्पी दा यांच्याकडे सुमारे 50 लाखांचे सोने होते. त्यांची एकूण संपत्ती सुमारे 20 कोटी रुपये आहे.
 
बप्पी दांप्रमाणेच त्यांची पत्नी चित्रानीलाही सोने आणि हिऱ्यांची शौकीन आहे. 2014 मध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे बप्पी दापेक्षा 967 ग्रॅम सोने, 8.9 किलो चांदी आणि 4 लाख रुपये जास्त किमतीचे हिरे आहेत.