गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 एप्रिल 2024 (15:06 IST)

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा अपघात!

Accident of Yeh Hai Mohabbatein' fame actress
प्रसिद्धी अभिनेत्रीचा मोठा अपघात, अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री ‘ये है मोहब्बतें’ या हिंदी मालिकेतून घराघरांमध्ये पोहचली होती. चाहत्यांचे खूप प्रेम या मालिकेला आणि या अभिनेत्रीला मिळाले होते. अशी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा मोठा अपघात झाला असून, मिळालेल्या माहितीनुसार तिच्या हाताची दोन हाडे तुटली असून शस्त्रक्रिया केली जाणार आहे असे दिव्यांकाचे पती दहियाने माहित दिली. 
 
दिव्यांका या अभिनेत्रीने ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेमधून मालिकाविश्वात पदार्पण केले. दिव्यांका हिने कमी वेळामध्ये आपले अनेक चाहते निर्माण केलेत. तिच्या या अचानक झालेल्या अपघाताने तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे. व याअपघातामध्ये तिच्या हाताचे दोन हाडे तुटली असून आता त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तिच्या चाहत्यांनी यावर काळजी व्यक्त केली आहे. पण हा अपघात कसा झाला हे अद्याप अजून समजले नाही. दिव्यांकाच्या पतिने सांगितले की तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

Edited By- Dhanashri Naik