बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 27 सप्टेंबर 2020 (13:42 IST)

'BigBoss -14 'काय सांगता, बिग बॉसने चक्क नियम मोडला

बिग बॉस पर्व 14 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दर वर्षी या शो मध्ये काही न काही नवीन बघायला मिळत असतं. यंदाच्या या पर्वणी बद्दल देखील प्रेक्षकांना जाणून घ्यावयाची फार उत्सुकता आहे. पण बिग बॉस नेहमीच आपल्या शो चे गुपित किंवा शो बद्दल कधी काहीच सांगत नसतो. असा त्याचा नियम आहे. ते गुपित प्रेक्षकांना शो च्या प्रक्षेपणातच कळतं. पण यंदाचा बिग बॉस 14 च्या या पर्वणी साठीचा हा नियम चक्क बिग बॉस ने मोडला आहे. 
 
प्रथमच बिग बॉसने शो लाँन्च टेलिकास्ट करण्याऐवजी शोच्या प्रक्षेपणाची एक झलक सोशल मीडिया वरून आपल्या प्रेक्षकांना दाखविली आहे. या शो चे येता 3 ऑक्टोबर रोजी ग्रँड प्रीमियर होणार आहेत. आणि शोमध्ये स्पर्धक म्हणून कोण कोण आहे हे गुपित उघडणार आहे. तरी ही एका कार्यक्रमात आढळून आले आहे की प्रख्यात गायक 'कुमार सानू' यांचा मुलगा 'जान सानू' देखील या शो मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेत आहे. आधी या माहिती बाबत शंका व्यक्त केली जात होती पण ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे शिक्कामोर्तब झालं. 
 
तसेच बिग बॉस पर्व 13 चे महाविजेता सिद्धार्थ शुक्ला त्यांना जिंकण्याचे खास टिप्स देताना दिसून आले. यंदाचे हे पर्व स्पर्धकांची इच्छा पूर्ण करणारे असणार. इथे त्यांना त्या सर्व सोयी मिळणार ज्यांना ते लॉकडाऊन मध्ये मुकले होते. जसे की स्पा, मॉल, थिएटर, आणि रेस्टारेंट सुद्धा यंदाच्या बिग बॉस मध्ये असणार. त्यामुळे स्पर्धक एक वेगळा अनुभव घेतील असे सलमान खानने सांगितले आहे. 
 
यंदाचे हे 14 वे पर्व देखील पर्व 13 सारखे हिट होणार अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली आहे. बिग बॉस 14 चे ग्रँड प्रीमियर 3 ऑक्टोबरला असून प्रेक्षकांची हा शो बघण्याची उत्सुकता अजून वाढली आहे.आणि प्रेक्षक या शो ची अगदी आतुरतेने वाट बघत आहे.