बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (15:44 IST)

ऐलान फाऊंडेशन आणि सलमान खान यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे पूरग्रस्तांसाठी घरांच्या पुनर्बांधणीस सुरवात केली

हा प्रकल्प ऐलान फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड मेगास्टार सलमान खान यांचा संयुक्त उपक्रम आहे
या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये, ऐलान समूहाने महाराष्ट्रातील पूरग्रस्त खिद्रापूर गाव दत्तक घेण्याची घोषणा केली होती आता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावात पूरग्रस्तांसाठी 70 घरांचे बांधकाम सुरू झाले आहे. हा प्रकल्प बॉलिवूडचे मेगास्टार सलमान खान, महाराष्ट्र सरकार आणि एलान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार प्रत्येक घर रुपये 95,000 इतका निधी देत आहे, तर उर्वरित खर्च सलमान खान आणि ऐलान फाउंडेशन करणार आहेत.
 
महाराष्ट्राचे मंत्री माननीय श्री. राजेंद्र पाटील यादवरावकर यांनी ट्विट केले की, 70 बाधित घरांचे काम अखेर सुरू झाले आहे. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले होते आणि  सरकारचा पाठिंब्याचे आश्वासन दिले. मंत्र्यांनी ‘भूमिपूजन’ समारंभ करताना दाखवलेल्या मालिकांच्या पोस्ट केल्या. सलमान खान ने ही एका इन्स्टाग्राम पोस्टवर या उपक्रमाचे कौतुक केले.
 
गेल्या वर्षी आलेल्या महापूरात उद्ध्वस्त झालेल्या पीडितांना प्रत्येकी 250 चौरस फूट क्षेत्राचे 70 घरे दिली जातील. कोल्हापूर जिल्ह्यात वसलेले खिद्रापूर हे भगवान शिव यांना समर्पित कोपेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
 
गावचे सरपंच हैदर खान मोकाशी म्हणाले की या विकासामुळे गावकरी अत्यंत आनंदित आहेत. ते म्हणाले की, राज्याच्या एका कोपरयात असलेल्या या छोट्या गावात मदत केल्याबद्दल त्यांना ऐलान फाउंडेशन आणि सलमान खानचा अभिमान आहे.
 
“निवारा ही मूलभूत गरज आहे आणि ज्यांनी पुरामुळे आपले प्राण आणि घरे गमावली त्यांच्याबरोबर आम्ही सहानुभूती व्यक्त करतो. एलान फाउंडेशन पूरग्रस्तांचा जीवन नव्याने सुरुवात करण्याच्या प्रयत्नात पुनर्वसन साठी वचनबद्ध आहे. समाजातील उपेक्षित वर्गाला मदत करण्याच्या दृष्टीकोनातून साकार होण्यारया बांधकामाची सुरुवात ही एक पाऊल आहे, ”असे एलन ग्रुपचे एमडी रवीश कपूर यांनी सांगितले.
 
2019च्या पुराचा परिणाम कोल्हापुरातील २२3 गावात झाला आणि जिल्ह्यातील सुमारे 28897 लोक विस्थापित झाले.
 
ऐलान फाऊंडेशन ही गुरुग्राम आधारित व्यावसायिक रिअल्टी डेव्हलपर, एलान ग्रुपची एक परोपकारी संस्था आहे आणि क्रांतिकारक नावीन्यपूर्ण विकास करीत आहेत. कोविड 19 च्या या लॉकडाऊन दरम्यान पण बिहारच्या विविध भागात मदत सामग्रीचे वितरण तसेच बांधकाम कामगारांना विनामुल्य रेशन, मास्क व सेनेटिझर्स वाटप करून  मदत केली आहे.