शुक्रवार, 2 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (17:12 IST)

वाचा, मुंबई-पुणे रेल्वेसेवा कधी सुरू होणार

राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवासावरील बंदी उठवली आहे. तेव्हा सरकारने परवानगी देताच मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. ही सेवा सुरू करण्याबाबतची आमची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्रातील प्रमुख शहरे म्हणून मुंबई आणि पुणे ओळखले जाते. नोकरी आणि कामानिमित्त या दोन्ही शहरांदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या मोठी आहे. लॉकडाऊनपासून रेल्वेची ही सेवा बंद आहे. आता राज्य सरकारने जिल्हा बंदी उठवली असून प्रवाशांना राज्यातील एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय या गाड्या सुरू करता येणार नाहीत, असे शर्मा यांनी सांगितले.