शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (10:43 IST)

सोलापूर विभागातील ८ रेल्वे स्थानकांना ISO मानांकन

एनएबीसीबी मान्यता प्राप्त बोर्डाद्वारे या स्थानकांचे लेखापरीक्षण करून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ८ रेल्वे स्थानकांना ISO मानांकन देण्यात आले आहे. या मानांकनानुसार सोलापूर विभागातील अहमदनगर, दौंड, कोपरगाव, लातूर, कलबूर्गी, शिर्डी, वाडी आणि कुर्डूवाडी या रेल्वे स्थानकांचा समावेश यात करण्यात आला आहे. यापुर्वी सोलापूर रेल्वे स्थानकाला ISO मानकांन प्राप्त झाले होते.
 
सोलापूर रेल्वे स्थानकाला सप्टेंबर २०१९ मध्ये ISO १४००१ मानांकन प्रदान करण्यात आले होते त्यानंतर सोलापूर विभागातील इतर रेल्वे स्थानकात देखील राष्ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महत्वपूर्ण बदल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये स्थानकाच्या छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे, प्लॅटफॉर्मवरील कव्हर शेडवर सौरउजेचे पॅनल बसवणे, प्लॅस्टिकमुक्त स्थानक बनवणे, यांत्रिकिकृत साफसफाईचा वापर करणे, कचऱ्याचे नियोजन, वॉटर आणि उर्जा ऑडिट, ध्वनिप्रदूषण इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला होता.
 
ISO मानांकन प्राप्त करण्यात आलेले हे प्रमाणपत्र तीन वर्षांसाठी वैध असणार असून या काळात आयएसओ १४००१ च्या मानकाचे पालन या रेल्वे स्थानकांना करावे लागणार आहे.