मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जुलै 2020 (15:31 IST)

राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने केला आत्महत्येचा प्रयत्न

माजी पंतप्रधान राजीव गांधींची मारेकरी नलिनी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे. नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. 
 
गेल्या २९ वर्षात पहिल्यांदाच नलिनीने अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं तिच्या वकिलाने सांगितलं आहे. नलिनीचं तिच्यासोब जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झालं होतं. यानंतर इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेलं होतं. यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं वकिलाने सांगितलं आहे. यावेळी त्यांनी यामागील खरं कारण समोर आलं पाहिजे अशी मागणीही केली आहे.
 
दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवलं जावं अशी मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.