रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (15:41 IST)

कोविड- 19 मुलं जर गप्प राहत असतील तर सावधगिरी बाळगा, हे देखील कोरोनाचे लक्षण होऊ शकतात

लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका प्रौढांपेक्षा कमी आढळतो. तरी ही याचा अर्थ असा नाही की तुमचा लाडका SARS-Cove-2 विषाणूच्या हल्ल्यापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. तरी ही बऱ्याच देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये उघडण्याची नियमावली गतीने सुरू होत आहे त्यासाठी मुलांमध्ये कोविड-19 संसर्गाची लक्षणे ओळखणे देखील आवश्यक आहे.
 
अमेरिकन ऍकेडेमी ऑफ पीडियाट्रिक्स कमिटी ऑन इंफेक्शियस डिसीजच्या अलीकडील केलेल्या अभ्यासानुसार कोरोना संसर्ग झालेल्या मुलांना देखील एकाद्या प्रौढ व्यक्तीच्या प्रमाणे सर्दी-पडसं, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे या सारख्या तक्रारी होऊ शकतात. इतकेच नाही तर ते गप्प राहत असल्यास, काही ही खात-पितं नसल्यास, किंवा नेहमीच थकवा जाणवत असल्यास पालकांना सावध राहणे आवश्यक आहे.
 
मुख्य संशोधक डॉक्टर डेनियल कोहेन यांचा म्हणण्यानुसार कोरोना ग्रसित मुलांमध्ये वास घेण्याची शक्ती कमी होण्यासारखा त्रास देखील होऊ शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये मुलांचा हातपायावर लाल चट्टे देखील आढळतात. तरी शारीरिक हालचालींमध्ये कमतरता हे देखील संसर्ग होण्याची सर्वात मोठी लक्षणे आहेत.
 
अशा परिस्थिती सर्दी-पडसं किंवा ताप आल्यामुळे मुलं गप्प राहत असल्यास किंवा त्याला संपूर्ण वेळ झोप येत असल्यास पालकांना हवे की त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्यांना सामान्य संसर्ग किंवा अशक्तपणा म्हणून घरगुती काढे, औषधोपचार करून मुलांची तब्येत सुधारण्याची वाट बघू नये.
 
विध्यार्थी आणि शिक्षकांच्या नियमित तपासणीवर भर-
पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) च्या नुकत्याच झालेल्या अभ्यासात, विध्यार्थी आणि शिक्षकांची कोरोनाची नियमित तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संशोधकांना असे आढळले की पाचव्या इयत्तेच्या वरील विद्यार्थ्यांपासून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका प्रौढांप्रमाणेच असतो. या मागील कारण त्यांचा शरीराचं प्रौढांप्रमाणे वागणं. त्यांच्यात एसीई -2 रिसेप्टरची संख्या वाढू लागते, ज्यामुळे व्हायरसला पेशींवर हल्ला करण्यासाठी मदत मिळते.
 
अनेक देशांमध्ये झालेला कहर-
फ्रांस - ओइसीच्या प्राथमिक शाळांमध्ये सरासरी नऊ टक्के विद्यार्थी आणि सात टक्के शिक्षक कोरोनाचे बळी झाल्याचे आढळले.
- इयत्ता पाचवीच्या वरील वर्गाबद्दल बोलावयाचे झाल्यास तर विध्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संसर्गाचे प्रमाण अनुक्रमे 43 आणि 38 टक्क्याने होते.
 
इजरायल- 150 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शाळेतील कर्मचारी यांच्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. कारण मे महिन्यात शाळा सुरू केल्या गेल्या.
 
अमेरिका - जुलै महिन्यातील शेवटच्या दोन आठवड्यात एक लक्ष पेक्षा अधिक विद्यार्थी आणि कमी वय असलेले तरुण सार्स-कोव्ह -2 व्हायरसाचे बळी ठरले.