रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (09:59 IST)

राज्यात १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर उपचार सुरू

राज्यात सोमवारी कोरोनाचे ११ हजार १५८ रुग्ण बरे झाले तर ११ हजार ८५२ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.३७ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ७३ हजार ५५९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ९४ हजार ५६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४१ लाख ३८ हजार ९३९ नमुन्यांपैकी ७ लाख ९२ हजार ५४१ नमुने पॉझिटिव्ह (१९.१४ टक्के) आले आहेत. राज्यात १३ लाख ५५ हजार ३३० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ७२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १८४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१ टक्के एवढा आहे.