शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (16:01 IST)

कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसरा

जगभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे ६२ हजार ५५० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.
 
अमेरिकेत करोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. देशभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३४ लाखांवर जाऊन पोहचला आहे. तर सध्या ७ लाख ५२ हजार ४२४ Active कोरोना रूग्ण असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत देण्यात आली आहे.
 
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्याप्रमाणे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचीही आकडेवारी अधिक आहे. आतापर्यंत भारतात २६ लाख ४८ हजार ९९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ६२ हजार ५५० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.