मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑगस्ट 2020 (16:20 IST)

तब्बल ११ हजार २८७ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, मात्र रूग्णांमध्ये कोरोना लक्षणे नाहीत

मुंबईत कोरोनासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ११ हजार २८७ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे कोरोनाचे लक्षणं दिसून आले नाहीत. असे असले तरी त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
 
मुंबईमध्ये सध्या १८ हजार २६३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर १ लाख ११ हजार ८४ जणांनी कोरोनाला हरवले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने ७ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४२५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३२९ रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या ७ लाख ३ हजार ८२३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २२ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.