मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (21:27 IST)

साराभाई वर्सेस साराभाई’च्या रोशेसला कोरोनाची लागण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता राजेश कुमार अर्थात ‘साराभाई वर्सेस साराभाई’चा रोशेसला कोरोनाची लागण झाली  आहे. राजेश कुमारने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. मी करोना पॉझिटिव्ह असून घरातच क्वारंटाइन झालो आहे, असं त्याने सांगितलं आहे. राजेशने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं असून ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘बा बहू और बेबी’ अशी गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे.
 
“माझ्या सगळ्या चाहत्यांना एक सांगायचं आहे. माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. पण सध्या मी होम क्वारंटाइन आहे. माझ्यासाठी तुम्ही करत असलेली प्रार्थना आणि दिलेल्या शुभेच्छा यासाठी मनापासून धन्यवाद. एक्सक्युज मी मॅडमच्या माध्यमातून पुन्हा लवकरच भेटू”, अशी पोस्ट राजेशकुमारने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली आहे.
 
दरम्यान, राजेश कुमार सध्या एक्सक्युज मी मॅडम या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त होता. या मालिकेत तो मुख्य भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘बा बहू और बेबी’, ‘खिचडी’, ‘शरारत’ अशा अनेक लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.