शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (22:51 IST)

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ जणांना करोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पाच पोलीस कर्मचारी, बंगल्यातील सहाय्यक, स्वयंपाकी, स्वच्छता कर्मचारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.
 
दरम्यान, कोव्हिड 19 पॉझिटिव्ह आढळलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत अन्य काही पोलिस अधिकार्‍यांनी देखील सेल्फ क्वारंटाइन केलं आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात मदतकार्य सुरू होते. याच दरम्यान करोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. आता ठाणे शहरातील करोनाबाधितांची संख्या 46 वरून 76 वर पोहचली आहे.