शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (22:32 IST)

राज्यात दिवसभरात 352 नवीन रुग्ण

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या 2334 इतकी झाली आहे. माहितीनुसार महाराष्ट्रात ‍दिवसभरात 352 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ही संख्या वाढली असून चिंता वाढली आहे. देशभरात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. करोनामुळे 11 जणांचा मृत्यूही झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
खबरदारी म्हणून महाराष्ट्रातला लॉकडाउन हा 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात अधिक रूग्ण मुंबईत आहेत. येथे बाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं असून अती आवश्यक असल्यास बाहेर पडलात तर मास्क लावणे अनिवार्य केले आहे.