गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 11 एप्रिल 2020 (17:49 IST)

धारावीत आजपासून स्क्रिनिंगला सुरुवात

मुंबईतल्या धारावीत आजपासून स्क्रिनिंगला सुरुवात झाली आहे. यासाठी 150 डॉक्टरांची टीम तैनात केली गेली असून मुंबई महापालिकेच्या मदतीने हे कार्य केलं जात आहे. हे सर्व महाराष्ट्र मेडिकल असोसिएनचे सदस्य आहेत.
 
मुंबईतील धारावी दाट वस्ती असून आत्तापर्यंत येथील 4 जणांचा बळी गेला आहे. खबरदारी म्हणून येथे स्क्रिनिंग केलं जात आहे. 
 
आता करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून महानगरपालिकेकडून हा भाग सील करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत.