रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : गुरूवार, 9 एप्रिल 2020 (16:49 IST)

क्रीडा संकुल नाही, आता हे आहे क्वारंटाईन वॉर्ड

मुंबईत वरळीतल्या एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलाचं क्वारंटाईन वॉर्डमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.

कोरोनामुळे मुंबईतील जी दक्षिण प्रभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा वॉर्ड कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आदी भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आणि त्यानंतर या भाग सील करून नागरिकांना पोद्दार रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलं. या भागात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढत असल्यानं आता जास्तीत जास्त लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे मुंबई महापालिकेनं नवे क्वारंटाईन वॉर्ड तयार करण्यास सुरुवात केली आहे.
वरळीच्या एनएससीआय म्हणजे राष्ट्रीय क्रीडा संकुलात अनेक क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमही होत असतात. या मोठ्या इनडोअर स्टेडियमचं रुपांतर आता क्वारंटाईन वॉर्डमध्ये होणार आहे. तब्बल ५०० बेडची व्यवस्था या स्टेडियममध्ये केली जात आहे.