बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (15:52 IST)

आदित्य विरुद्ध मनसेचा उमेदवार नाही, 'ऋणी' असल्याची उद्धव यांची भावना

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी  उमेदवारी अर्ज दाखल केला.  आदित्य ठाकरेंनी अर्ज दाखल केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाही असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “जे आदित्यला आशिर्वाद देत आहेत त्या सर्वांचा मी ऋणी आहे”.
 
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, शिवसेनेची समाजसेवेची परंपरा पुढच्या पिढीत कायम राहत आहे. आम्ही निवडणूक न लढण्याचं ठरवलं होतं, पण हे नवीन पिढीचे विचार आहेत. तरुणांच्या विचाराने देश आणि राज्य पुढे जावं हीच इच्छा आहे”. यावेळी उद्धव ठाकरे यांनी . स्थानिक आमदार सुनील शिंदेंचेही आभार मानले. आदित्य ठाकरेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया देताना जनतेचं प्रेम नवा महाराष्ट्र घडवण्यास मदत करेल असं म्हटलं आहे.