गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (08:57 IST)

मनसेच्या नेत्याला तिकीट, भाजपाने कापले विद्यमान आमदाराची उमेदवारी

नाशिक मध्ये मोठा राजकीय गोंधळ पहायला मिळाला आहे. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडल्या असू, विद्यमान आमदाराला डावलून मनसेतून आलेल्या नेत्याला भाजपने उमेदवारी दिली आहे. नाशिक पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार बाळासाहेब सानप यांना डावलून मनसेतून भाजपमध्ये उडी मारणाऱ्या राहुल ढिकले यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. 
 
राहुल ढिकले हे मनसेचे माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे चिरंजीव असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल ढिकले यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. ढिकलेंना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.दुसरीकडे, सानप यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. खुद्द बाळासाहेब सानप यांचाही हिरमोड झालेला आहे. भाजपचे अनेक नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.