शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: गुरूवार, 3 ऑक्टोबर 2019 (08:55 IST)

रश्मी बागल यांना शिवसेनेकडून करमाळ्यातून उमेदवारी जाहीर

मुंबई – करमाळा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान आमदार नारायण पाटील यांचा पत्ता कट करून राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. बागल यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म देखील दिला आहे.
 
राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांना उमेदवारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रश्मी बागल या मातोश्री वर आल्या होत्या. मात्र त्यांना रात्री रिकाम्या हाताने परत जावं लागल होत. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना मंगळवारी परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र त्यांच्या या उमेदवारीला शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी विरोध केला होता. मात्र अखेर शिवसेनेने त्यांना डच्चू देत रश्मी बागल यांच्या पदरात तिकीट टाकले आहे. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असेही नारायण पाटील म्हणाले होते. त्यांनी आपली भूमिकाही पक्षासमोर मांडली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.