शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑक्टोबर 2019 (11:28 IST)

भाजपाकडून मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी, गणेश नाईकांना डच्चू

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून महत्त्वाच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु या यादीत भाजपने गणेश नाईक नाईकांना डच्चू देत विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच पुन्हा संधी दिली आहे.

दरम्यान, गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर म्हात्रेंचा पत्ता कात होईल की काय अशी चर्चा होती. तसेच मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या यादीत नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात आलेल्या गणेश नाईक यांच्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती.

नवी मुंबईत भाजपाकडून गणेश नाईक यांना तिकिट मिळण्याबाबत हिरवा कंदिल मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे असे झाल्यास विद्यमान आमदार मंदा म्हात्रे नाराज होणार हे निश्चित मानलं जातं होतं. बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांसोबत विभागवार बैठकांना सुरुवातही केली होती. 
 
काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात आले. मात्र त्यांच्या येण्याचा फटका विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बसल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.