ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे भरणार पहिल्यांदा निवडणूक अर्ज, ही आहे तारीख
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहेत. आदित्य विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती असणार आहेत जे निवडणूक लढवतील. लोकांमधून निवडणूक लढवणारे ते ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य ठरणार आहेत. आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
युतीची घोषणा थोडी रेंगाळली त्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अद्याप अधिकृतपणे घोषित केली नाही. युतीच्या घोषणेनंतर शिवसेना तात्काळ स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणार आहे. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने त्या दिवशी वरळीत शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन होण्याचीही शक्यता आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतीही निवडणूक किंवा कोणत्याही पदावर राहिले नाही, मात्र विरोधात असो व सत्तेत बाळासाहेब नेहमीच चर्चेत व सरकारवर दबाव टाकणारे मोठे नेते होते.