शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (15:53 IST)

असाच एक क्षण आपल्यावर आला होता : उद्धव ठाकरे

मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही, काल पवार कुटुंबाबत घडलं, जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचे काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.
 
हा महाराष्ट्र कुणाशी सुडाने वागत नाही. आम्ही कुणाशी सुडाने वागणार नाही. पण आसूड ओढतो. असाच एक क्षण आपल्यावर आला होता, बाळासाहेबांना अटक करण्यासाठी दंड थोपटले होते. उस्फूर्तपणे जनता रस्त्यावर उतरली होती. सरकार कुणाचे काय होते ते स्पष्ट आहे. आम्ही कुणाच्या मध्यस्थीसाठी गेलो नव्हतो. न्यायमूर्ती म्हणाले केसच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठले डायरेक्टर नव्हते…फायली अफरातफर नव्हती. हिंदूंचे रक्षण करणे हा गुन्हा होता ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत, शरद पवारांच्या ईडी कार्यालय भेटीवर बोलले आहेत.