शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 28 सप्टेंबर 2019 (15:50 IST)

म्हणून अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून राजीनामा दिला

अजित पवारांनी वैफल्यग्रस्तेतून डिप्रेशनमधून राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला. “गेली 5 वर्ष सातत्याने भाजप सरकारने अजित पवारांना बदनाम केले. भाजपच्या मनात राग होताच. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढल्यानंतर महाराष्ट्राच्या एक वर्ग हा अजित दादांना टार्गेट  करत होता. त्यांचा मोकळा स्वभाव त्यांचा करडा आवाज हे महाराष्ट्राला दिसतं. पण त्यांचा कुटुंब वत्सल स्वभाग, भावना प्रधान, हृदयामध्ये अतिशय मृदू असलेला अजित पवार कोणालाही माहित नाही, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.”
 
“गेल्या अनेक वर्षात ते अनेकदा बोललं जितेंद्र खूप त्रास होतो रे, पण अस असलं तरी ते दाखवत नव्हते. पण त्यांना जे छळण्यात आलं त्याचा मनस्ताप झाला आणि ईडी हा त्यातील अंतिम आघात होता, असाही घणाघात आव्हाडांनी केला.”