म्हणून पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांना पाठिंबा दर्शवला होता. शरद पवार राजकारणातील भीष्म पीतमाह असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं होतं. तसंच महाराष्ट्राने अशा पद्धतीचं सूडाचं राजकारण पाहिलेलं नाही असं म्हणत त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शवला होता.
संजय राऊत यांनी म्हटलं होतं की, “अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की, ज्या बँक घोटाळ्यावरुन ईडीने एफआयआर दाखल केला आहे, त्या बँकेत शरद पवार कोणत्याही पदावर नव्हते. तक्रारदाराने आपण कधीही शरद पवारांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. अण्णा हजारे यांनीदेखील त्यांना क्लीन चीट दिली आहे”.