रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (16:03 IST)

राजकारण हा माझा पिंड नाही: उदयनराजे भोसले

सातारा: साताऱ्यामध्ये आज दोन्ही राजे एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत येत्या विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्या मधून शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि सातारा लोकसभा पोट निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले हे आपापले अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल करणार आहेत. या दोन्ही राजांमधला वाद संपूर्ण महाराष्ट्राने यापूर्वी पाहिला आहे मात्र दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यामुळे दोघांनीही एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला.
 
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले उदयनराजे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असून आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानसभेसाठी साताऱ्यातून शिवेंद्रराजे यांना उमेदवारी देण्यात येत असून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं एकत्रित शक्तीप्रदर्शन सुरु आहे. शिवेंद्रराजे भोसले जावळी विधानसभा जागेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.
 
यावेळी उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकारण हा माझा पिंड नाही. मी मुद्यांवर आधारित राजकारण करतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांना आपली काम व्हावीत अशा अपेक्षा माझ्याकडून असून त्या पूर्ण करेन असं त्यांनी म्हटलं. याआधी आलेला अनुभव चांगला नव्हता असंही ते सांगायला विसरले नाहीत. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही असंही ते म्हणाले आहेत.