गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By

कॉंग्रेस पक्षाची पहिली ५० उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसने पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, पहिल्या उमेदवार यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह 51 नावांचा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे डॉ. विश्वजित पतंगराव कदम पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ, आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर (मध्य) येथून निवडणूक लढवणार आहेत.  
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून रमेश बागवेंना भोरमधून संग्राम थोपटेंना, पुरंदरमधून संजय जगताप,  जत विधानसभा मतदारसंघातून विक्रम सावंत काँग्रेसची उमेदवारी जाहीर करण्यात आला आहे. आता पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेसने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेस पक्षात आधीच मरगळ आहे, अनेक नेते पक्ष सोडून भाजपा, शिवसेनेत गेले आहे. तर मागील निवडणुकीत भाजपकडून मोठा पराभव पक्षाला स्वीकारावा लागला होता.