बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिपाशाकडेही आता हलणार पाळणा

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री असा लौकीक मिळविलेल्या बिपाशा बसूकडे लवकरच पाळणा हलणार असल्याचे वृत्त आहे. बिपाशा व करणसिंह जोहर यांचा विवाह एप्रिलमध्ये झाला असून त्यानंतर बिपाशाने सोशल मिडीयावर शेअर केलेले तिचे हनीमून फोटोही खूप गाजले होते. या लग्नावर बिपाशाचे कुटुंब नाराज होते असेही सांगितले जात होते तसेच बिपाशा व करणसिंह ग्रोव्हर यांच्यात मतभेद सुरू झाल्याची वार्ताही येत होती त्या पार्श्वभूमीवर बिपाशा आई होणार असल्याची बातमी आली आहे. अर्थात बिपाशा अथवा करणसिंह यांच्याकडून या संदर्भात कांहीही स्पष्टीकरण दिले गेलेले नाही.
 
शाहीदकपूर व मीरा या जोडीला नुकताच कन्यालाभ झाला आहे त्यापाठोपाठ करिनाही डिसेंबरमध्ये आई बनणार आहे.थोडक्यात बॉलीवूड मध्ये सध्या बेबीबूम आहे असे म्हणायला हरकत नाही.