शनिवार, 15 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 नोव्हेंबर 2025 (08:33 IST)

गोविंदाची तब्येत अचानक बिघडली, बेशुद्ध झाल्यानंतर अभिनेता रुग्णालयात दाखल

govinda
मंगळवारी रात्री बॉलिवूड अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली. बेशुद्ध पडणे आणि चक्कर आल्याच्या तक्रारीनंतर त्याला पहाटे १ वाजता मुंबईतील जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अशी माहिती समोर आली आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाची तब्येत पुन्हा बिघडली आहे. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याची तब्येत अचानक बिघडली. सुरुवातीला त्याला घरीच औषध देण्यात आले होते, परंतु पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्याची प्रकृती आणखी बिघडली, त्यानंतर त्याला मुंबईतील जुहू येथील क्रिटिकल केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेशुद्ध पडल्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल केले आणि अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या, ज्याचे निकाल येण्याची वाट पाहत आहे. त्याचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी माध्यमांना सांगितले की अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो वैद्यकीय देखरेखीखाली आहे. बिंदल म्हणाले की सध्या काळजी करण्याची गरज नाही; त्याला फक्त काही दिवस आराम करण्याची गरज आहे. चाहते गोविंदाच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहे.
Edited By- Dhanashri Naik