Video शाहरुख खानच्या नावाने उजळला 'बुर्ज खलिफा', दुबई बादशहाच्या सन्मानार्थ 'हॅप्पी बर्थडे SRK'असा मेसेज झळकत होता
बॉलिवूडचा किंग खानने 2 नोव्हेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. शाहरुखने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यासाठी त्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. शाहरुख खान सध्या दुबईत असून तेथे त्याने कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा शाहरुख खानच्या नावाने आणि चित्राने उजळून निघाली.
शाहरुखने एक भावनिक पोस्ट लिहिली
शाहरुखने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर या दृश्याचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. यावेळी ते स्वतः तेथे उपस्थित होते. शाहरुखने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. शाहरुखने लिहिले की, 'स्वतःला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वोच्च पडद्यावर पाहणे चांगले वाटते. माझा मित्र @mohamed_alabbar याने माझ्या पुढच्या चित्रपटापूर्वीच मला सर्वात मोठ्या पडद्यावर स्थान दिले आहे. धन्यवाद आणि प्रेम... माझी मुले खूप प्रभावित झाली आणि मला ते पाहून प्रेम झाले.'