शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 नोव्हेंबर 2021 (10:51 IST)

गाडीवरील नियंत्रण सुटले, इन्स्टाग्राम स्टारला अटक

मुंबई : सोशल मीडियावर स्टार असलेल्या एका तरुणाने भरधाव वेगात कार चालवत अपघात केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामवर तब्बल अडीच कोटींच्या जवळपास फॉलोअर्स असलेल्या फैजल शेख ऊर्फ फैजू याने एका सोसायटीच्या गेटला भरधाव वेगात गाडी धडकवून अपघात केला आहे.
 
भारतात बंद पडलेलं टिकटॉक आणि इन्स्टग्रामचा स्टार असलेला फैजू काल त्याच्या सहकाऱ्यांसह ओशिवरा येथील मिलत नगर विभागात त्याच्या बीएमडब्लू कारने आला होता. मात्र भरधाव वेगात त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी इथल्या अल तबुत या सोसायटीच्या गेटला धडक देऊन या सोसायटी मध्ये घुसली. 
 
सुदैवाने या ठिकाणी त्या वेळी कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झालेली नाही. मात्र धडक बसल्याने सोसायटीचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी फैजूच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
 
इन्स्टाग्रामवर फैजूचे तब्बल अडीच कोटीच्या जवळपास फॉलोअर्स आहेत.