गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (08:03 IST)

नवाब मलिक यांच्या आरोपांवर अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाल्या-‘चोराच्या…’

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते नवाब मलिक  यांनी ड्रग्स प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस  यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. नवाब मलिकांनी अमृता फडणवीस  यांचा फोटो ट्विट केला होता. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला होता. शिवाय जयदीप राणा या ड्रग्स पेडरलनं  अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हर अँथमला अर्थसहाय्य केलं होतं. असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नवाब मलिकांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देतना अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केले आहे.
अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असं प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मलिकांना दिले आहे.

नवाब मलिक काय म्हणाले ?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या पत्नीने अमृता यांनी एक गाणं गायलं होतं. नदी संरक्षण अभियानासाठी ‘रिव्हर साँग’ बनवलं होतं. त्यात सोनु निगम आणि अमृता यांनी गाणं गायलं होते. तर त्यात देवेंद्र फडणवीस यांनी अभिनय केला होता. या गाण्याला जयदीप राणा यांनी अर्थसहाय्य पुरवलं होतं. राणा हे ड्रग्स पेडलर आहेत. देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गणपती दर्शनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस व जयदीप राणा एकत्र आहेत. तसेच फोटोही आहेत. हे प्रकरण राज्यातील ड्रग्स व्यवसायासंबंधित आहे, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे.