संबंधित माहिती
- समीर वानखेडेंना मोठा दिलासा ! धर्मांतर केल्याचे सकृतदर्शनी दिसत नाही – राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
- दिव्यात आगीमुळे घर कोसळून महिलेचा मृत्यू
- अनिल देशमुख 100 कोटी लाच प्रकरणात पहिली अटक, सीबीआयने मध्यस्थाला अटक केली
- आर्यनच्या सुटकेनंतर नवाब मलिक म्हणाले- समीर वानखेडेने बनवली होती प्रायव्हेट आर्मी
- लोकल प्रवाशांना मोठा दिलासा : राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय, प्रवासासाठी आता लोकलच्या पासची गरज नाही
अखेर ”नॉट रिचेबल” अनिल देशमुख ED कार्यालयात दाखल
मुंबई | मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुखआज सोमवारी ईडी कार्यालयात दाखल झाले. जबाब नोंदवण्यासाठी ते ईडी कार्यालयात दाखल झाले असल्याचे समजते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत.
