बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (13:38 IST)

लूक बदलून आयुष्यमान चित्रपटगृहात

अभिनेता आयुष्यमान खुरानाचा 'आर्टिकल 15' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली असून चित्रपटातील आयुष्यमानची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. तसेच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरच्या जादूमुळे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आनंदी असल्याचे दिसत आहे. सध्या आयुष्यमान त्याचा आगामी चित्रपट 'बाला'च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. लखनऊमध्ये सुरु असलेल्या चित्रीकरणादरम्यान वेळ काढून आयुष्यमान 'बाला' चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक आणि टीमच्या इतर सदस्यांना घेऊन 'आर्टिकल 15' पाहण्यासाठी पोहोचला. 'बाला' चित्रपटाची टीम 'आर्टिकल 15' प्रदर्शित झाल्यापासून आयुष्यमानकडे चित्रपट दाखवण्याची मागणी करत होते. शेवटी आयुष्यमान 'बाला' चित्रपटाचे चित्रीकरण संपवून हॉटेल जवळील एका चित्रपटगृहामध्ये पोहोचला. दरम्यान आयुष्यमानने त्याचा लूक बदलला होता. चाहत्यांपासून वाचण्यासाठी आयुष्यमानने चित्रपट सुरु झाल्यावर चित्रपटगृहामध्ये एण्ट्री केली तर चित्रपट संपताच चित्रपटगृहाबाहेर धावही घेतली. 'आर्टिकल 15' चित्रपटातील आयुष्यमानचा अभिनय पाहत सर्व टीमने आणि बाला चित्रपटाचे दिग्दर्शक कौशिक यांनी आयुष्यमानची प्रशंसा केली.