शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (14:31 IST)

बॉबी देओलच्या #ClassOf83चे ट्रेलर रिलीज, डिजिटल प्लेटफॉर्मवर या दिवशी पाहायला मिळणार

अभिनेता बॉबी देओल 'क्लास ऑफ 83' चित्रपटाद्वारे डिजीटल जगात प्रवेश करणार आहे. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 21 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन प्रदर्शित होईल.
 
सुपरस्टार शाहरुख खान, रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'क्लास ऑफ 83' ची निर्मिती केली जात आहे. प्रोजेक्ट संदर्भात हा चित्रपट पुढील महिन्याच्या 21 तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
 


चित्रपटाचे दिग्दर्शन अतुल साबरवाल करत आहेत. हे नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. 'क्लास ऑफ 83' चित्रपटात आपली झलक शेअर करताना बॉबी देओलने सांगितले होते की, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होईल.
 
याशिवाय बॉबी देओल आश्रम या वेब सिरींजमध्येही दिसणार आहे. नुकताच त्याने त्याचे टीझर रिलीज केले. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रमातल्या वेब सिरींजमध्ये तो दिसणार आहे. ही मालिका पुढील महिन्यात म्हणजेच 28 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होईल.
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉबी देओल या मालिकेत बाबांची भूमिका साकारणार आहे. ही मालिका राजकीय उपहास यावर आधारित आहे. यात अनुप्रिया गोएंकासुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.