मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (15:34 IST)

‘कॅरोल लोम्बार्ड आणि गोल्डी हॉन यांच्यासारख्या अभिनय क्षेत्रातील महान व्यक्तींसोबत तुलना ही अतिशय आनंददायक बाब!’: भूमी पेडणेकर

bumi pednekar
भूमी पेडणेकर हिचा थॅंक यू फॉर कमिंग (TYFC) सिनेमा आज प्रदर्शित होत असल्याने ती अतिशय खूश आहे. या प्रतिभावंत आणि चतुरस्त्र अभिनेत्रीने नव्या युगातील सिनेमांत वठवलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल तिच्यावर चारही दिशांतून कौतुकाचा वर्षाव झालेला दिसतो. वास्तविक पाश्चिमात्य मीडियाने भूमीच्या अभिनयाची तुलना कॅरोल लोम्बार्ड आणि गोल्डी हॉन यांच्यासारख्या अभिनय क्षेत्रातील हुकमी एक्क्यांसह केल्याने अभिनेत्रीची अवस्था आनंद गगनात मावेना अशी झाली!  
 
भूमी म्हणते, “थँक यू फॉर कमिंग’मधील माझ्या कामगिरीबद्दल मीडियाने माझी तुलना कॅरोल लोम्बार्ड आणि गोल्डी हॉन सारख्या अभिनय क्षेत्रातील सार्वकालिन महान व्यक्तींशी करण्यात आली; हे माझ्यादृष्टीने एक अत्यंत समाधानकारक बाब आहे. हे कौतुक आयुष्यभर मला पुरून उरेल. लोक म्हणतात की मी आजीवन पुरेल अशी कामगिरी केली आहे, त्यांच्या असं म्हणण्यावर माझा विश्वास बसत नाही. मी माझ्या वाटेने येणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघाले आहे आणि मला याचा खूप आनंद वाटतो.”
 
ती सांगते, “मला एक अभिनेत्री म्हणून कायमच प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचे होते. जितकं आव्हान मोठे आणि हातातील काम अवघड, तितकी तुम्हाला साचेबद्ध चौकट मोडण्याची संधी अधिक! अशाप्रकारचे वातावरण माझ्याकरिता प्रेरक ठरते. मी माझ्या फिल्ममेकर्सचे आभार मानते; ज्यांनी माझ्या प्रयत्नांवर तसेच मी त्यांच्या द्रष्टेपणाकरिता एक पाऊल पुढे जाईन यावर विश्वास ठेवला.”
 
भूमी ही TYFC मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार आहे, जी पितृसत्ताक जगात स्त्री सुखाचा महत्त्वाचा विषय हाताळेल.
 
भूमी म्हणते, “करण बुलानी हा एक अविश्वसनीय प्रतिभावान दिग्दर्शक असून रिया कपूर आणि एकता कपूर यांच्या रूपाने ‘थँक यू फॉर कमिंग’करिता प्रतिभावान, दूरदर्शी निर्माते मिळाले हे मी माझं भाग्य समजते. त्यांनी मला आयुष्यभर पुरेल असा चित्रपट अनुभव दिला आहे आणि त्यांचे आभार मानायला माझे शब्दच कमी पडतील. प्रत्येकाने पाहण्याजोगा हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे - मुली आणि मुलांनी जरूर पहावा. कारण तो अत्यंत महत्त्वाच्या आणि समर्पक विषयावर भाष्य करतो.”
 
ती पुढे म्हणते, “एखाद्या मुलीला तिचे अधिकार असतात. स्त्रीला तिचा हक्क आहे. या अधिकारांचा वापर केल्याबद्दल तिने प्रसंग साजरे केले पाहिजे. TYFC हा स्त्रीत्वाच्या भावनेचा उत्सव आहे आणि मला कमालीचा अभिमान वाटतो की मी या सिनेमाचे शीर्षक दिले आहे. एक महत्त्वाचा संदेश देण्यासाठी मी एक साधन झाले.”