शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (17:00 IST)

लग्नाआधीच विकी आणि कतरिनाच्या विरोधात तक्रार, जाणून घ्या का?

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. समोर आलेल्या बातम्यांनुसार, विकी आणि कतरिना राजस्थानच्या रणथंबोरमध्ये लग्न करणार आहेत, ज्यासाठी लग्नाच्या डेस्टिनेशनवर सर्व तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे, लग्नाआधीच हे जोडपे कायदेशीर अडचणीत अडकले आहे. राजस्थानमधील एका वकिलाने कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
सध्या राजस्थान मध्ये या दोन्ही दिग्गज कलाकारांच्या लग्नाबाबत सुरक्षेच्या दृष्टीने खडू-चौघबंदीवर पूर्ण लक्ष दिले जात आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद झाले असून, या पार्श्वभूमीवर सवाई माधोपूर जिल्ह्यातील वकील नेत्रबिंदू सिंग जदौन यांनी अभिनेते-अभिनेत्रीविरुद्ध जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात तक्रार दाखल केली आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने राजस्थानच्या प्रसिद्ध चौथ माता मंदिराकडे जाणारा रस्ता 6 ते 12 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे, त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागू शकतो. या विरोधात वकील नेत्रबिंदू सिंह जदौन यांनी सिक्स सेन्स फोर्ट  वारा, लग्नस्थळाचे व्यवस्थापक, कतरिना कैफ, विकी कौशल आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीत भाविकांच्या समस्या व तक्रारी लक्षात घेऊन मंदिराकडे जाण्याचा मार्ग खुला ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तक्रारदार जदौन यांनी आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे की, चौथच्या बरवाडाचे देवीचे मंदिर पुरातन आहे. दररोज भाविक येथे दर्शनास येतात.  
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर हॉटेल व्यवस्थापकाने 6 ते 12 डिसेंबरपर्यंत मंदिराकडे जाणारा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी प्रचंड त्रास होत आहे. लग्नामुळे हॉटेल सिक्स सेन्सेसपासून मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता पुढील सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन चौथ माता मंदिराचा मार्ग हॉटेल सिक्स सेन्ससमोरून खुला करावा, असे फिर्यादीत म्हटले आहे.