शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 6 डिसेंबर 2021 (15:56 IST)

कतरिना लग्नाआधी विकीच्या घरी पोहचली, चेहर्‍यावर दिसत होता आनंद

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आपल्या नात्याबद्दल अजूनही काही सांगतिलं नसलं तरी चर्चा आहे की 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानच्या एका हॉटेलमध्ये विकी आणि कतरिना विवाह बंधनात अडकतील. या दरम्यान कतरिनाला विकीच्या घराबाहेर स्पॉट केलें गेलं ज्याने या गोष्टीला बळ मिळतं की दोघेही लवकरच लग्न करणार आहे. या वेळी कतरिनाच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. तिच्यासोबत तिची आई सुजैन टरकोटे देखील होती.
 
कतरिनाने साडी नेसलेली होती आणि खूप सुंदर दिसत होती. कतरिना सासरी पोहचली यावरुन कळून आले की दोघेही आपल्या नात्याला नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाणार आहे.
 
सूत्रांप्रमाणे विकी आणि कतरिना यांच्या लग्नाचे फंक्शन 7 डिसेंबर रोजी सुरु होतील आणि 9 डिसेंबर पर्यंत चालतील. कॅट-विकी यांच्या लग्नातील वेन्यू, मेन्यू आणि वेडिंग आउटफिट सर्वच खास असणार आहे. सूत्रांप्रमाणे कतरिना आपल्या लग्नात सर्वात महागडे फुटविअर घालणार आहेत. ती हाय फॅशन ब्रांडचे फुटविअर घालणार आहे, जे लग्नासाठी स्पेशली कस्टमाइज्ड करवण्यात आले आहे. हे कस्टमाइज्ड फुटविअर ट्रायलसाठी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये स्थित एका दुकानातून कतरिनाच्या घरी नेण्यात येतील.
दोघेही 9 डिसेंबर रोजी राजस्थानच्या सवाई मधोपुरच्या सिक्स सेंस फोर्ट रिसॉर्टमध्ये लग्न करतील. त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. मंडप खास सजवण्यात आले आहे. मंडप पूर्णपणे काचेने तयार करण्यात आलं आहे. 
 
विकी या हॉटेलच्या राजा मानसिंग सुईटमध्ये राहतील तर कतरिना राजकुमारी सुईटमध्ये राहणार आहे. या लग्नात 120 पाहुणे असतील. त्यांना सुरक्षा कारणांमुळे सीक्रेट कोड देण्यात आले आहे. हे कोड दाखवून त्यांना कार्यक्रम स्थळी एंट्री मिळू शकेल.